SchoolRules
निवासी विद्यार्थ्यांकरिता
- महिन्यातून एक दिवस पालक भेट असेल. सदर दिवशीच पाल्याला भेटता येईल.
- पालक भेटीव्यतिरिक्त पाल्यास भेटता येणार नाही अगर फोन दिला जाणार नाही.
- पालक भेटीची वेळ : सकाळी ९ ते सायं. ६ अशी राहील.
- पाल्याजवळ खाऊ, पैसे व मौल्यवान वस्तू ठेवता येणार नाहीत.
- पालकभेटीला शैक्षणिक फी दिलेल्या मुदतीत भरून पूर्ण करावी.
- पालकभेटीला पाल्यास परस्पर घरी सोडले जाणार नाही. पाल्याला घरी नेण्याची व शाळेत सोडण्याची जबाबदारी पालकांची आहे.
- पाल्यास घरी नेण्यापूर्वी व शाळेत सोडण्यापूर्वी पाल्याची शाळा रजिस्टरला नोंद करावी.
- पाल्याची आरोग्य विषयक माहिती पालकांनी अगोदर द्यावी.
- शाळेचे नियम अथवा शिस्त मोडल्यास अगर गैरवर्तन केल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.
- प्रशालेत पाल्याला भेटण्यासाठी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
अनिवासी विद्यार्थ्यांकरिता
- विद्यार्थ्यांकडे कोणत्याही प्रकारचे मौल्यवान साहित्य, मोबाईल फोन अशा प्रकारच्या वस्तू देऊ नये.
- विद्यार्थी गैरहजर राहणार असल्यास त्याची पूर्वकल्पना पालकांनी वर्गशिक्षकांना द्यावी अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.
- निवासी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची वस्तू, खाऊ अशा प्रकारच्या वस्तू आणून देऊ नये.
- प्रशालेत दिलेला गृहपाठ (स्वाध्याय ) घरी आल्यानंतर पालकांनी पूर्ण करून घ्यावा.
- विद्यार्थ्यांच्या आरोग्या संदर्भात काही तक्रार असल्यास त्याची पूर्वकल्पना द्यावी.
- विद्यार्थ्यांनी प्रशालेत गैरवर्तन केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
- आठवड्यातील वारानुसार ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करणे बंधनकारक आहे.
- ज्यावेळी पालकभेट असेल त्या दिवशी पालकांनी उपस्थित राहावे.
- दिलेल्या वेळेत शैक्षणिक फी भरणे अनिवार्य आहे.
© 2019. All Rights Reserved | Design by Mohitinfotech