(मुख्याध्यापिका)
नवजीवन शिक्षण संस्था संचलित विश्वसेवा पब्लिक स्कूल, विश्वसेवा विद्यामंदिर, जिजामाता माध्यमिक विद्यालय,
विश्वसेवा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स तसेच विश्वसेवा अकॅडमी व सैनिकी पॅटर्न निवासी शाळा ऐतवडे खुर्द, ता. वाळवा,
जि . सांगली. विश्वसेवा शिक्षण संकुलाची मुख्याध्यापिका या नात्याने मला तुम्हाला सांगताना मन:स्वी अत्यानंद होत आहे .
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने शासनाच्या अनुदानाची अपेक्षा न करता
मोठ्या हिमतीने नवजीवन शिक्षण संस्थेची स्थापना केली. के. जी ते ज्युनि. कॉलेज पर्यंतच्या शिक्षणाची संधी निर्माण केली. आज जवळपास ४५० ते ५००
विद्यार्थी या शिक्षण संकुलात शिक्षण घेत आहेत. "विद्यार्थी घडावा" अशी भूमिका असल्याने शिक्षक ते मुख्याध्यापक हा प्रवास सोपा व सुकर झाला.
संस्था व शिक्षक यामध्ये काम करत असताना समन्वयी भूमिका स्वीकारून योग्य
दुवा साधता आला. पाटील सरांच्या योग्य नियोजनामुळे संस्थेची उभी असलेली तीन मजली इमारत, भव्य क्रीडांगण व पाच स्कूल
बसेस एवढे वैभव दिमाखात उभे आहे त्या वैभवात मला मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना फार मोठे समाधान लाभत आहे.
तज्ञ व अनुभवी शिक्षकवृंद या संस्थेची ताकद आहे. नव नवे उपक्रम राबवत
असताना वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे यश पाहून या संस्थेत ज्ञानदान करते याचा सार्थ अभिमान वाटतो.
लवकरच तपपुर्तीकडे वाटचाल करणारी हि संस्था यशाची उत्तुंग शिखरे गाठीत राहो. हि सदिच्छा....
© 2019. All Rights Reserved | Design by Mohitinfotech