About Us

Welcome to Vishwaseva Vidyamandir


               २० जून २००७ साली विश्वसेवा विद्यामंदिरची स्थापना झाली. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आणि या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आजचा विद्यार्थी सुसंस्कारी, स्वयंपूर्ण निरोगी व सर्वगुणसंपन्न असणे आवश्यक आहे. म्हणूनच आमच्या शाळेचे सर्व कामकाज हे अत्यंत शिस्तबद्धपणे सुरु असते. आमच्या शाळेचा विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये झळकताना दिसून येतो. 'या शिक्षण यज्ञातून अनेक हुशार विद्यार्थी बाहेर पडतील ते फक्त सुशिक्षित नव्हे तर सुसंस्कृत भारतीय नागरिक म्हणूनच ' याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
               पारंपरिक पद्धतीची गुरुशिष्याची परंपरा जपण्याच्या हेतूने आम्ही २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात निवासी संकुलाची सुरवात केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना लागणाऱ्या सुविधा सुसज्ज वसतिगृह स्वच्छ नीटनेटके, भोजनगृह वर्ग, शैक्षणिक साधने, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडासाधने इ. भौतिक सुविधा याचबरोबर तज्ञ क्रीडा प्रशिक्षक वर्गामार्फत विविध खेळाचे प्रशिक्षण पुरवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टचा एकनिष्ठ राहिल्याने आमच्या संकुलामध्ये विविध मैदानी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी कमी कालावधीमध्ये जिल्हा व राज्यस्तरावर भरारी घेऊन अनेक पदकांची कमाई केली.

विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा शुभारंभ

नव्या युगाची हाक आमुची , झेप आमुची यशाकडे
धमक कुणाची अडवण्याची , गती आमुची पुढे पुढे

100%

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

99%

ज्ञान रचनावादी अभ्यासक्रम

98%

आधुनिक व अद्ययावत शिक्षण प्रणाली

100%

१० वी व १२ वी चा निकाल